वांग्याचे भरीत
आईची आठवण या चित्रपटीय गळेकाढू प्रकरणातला माझ्याबाबतीत सर्वांत खरा आणि महत्त्वाचा भाग असेल, तर तो इतकाच की घरी मिळणारं आयतं, चवीपरीचं आणि पारंपरिक अन्न घराबाहेर राहिल्यावर मिळेनासं झालं. बाहेरचं खाणं ही माझ्यातल्या मुंबैकरणीला अगदी सवयीची नि आवडीची गोष्ट खरीच. पण किती झालं तरी ताकातली उकड, भाजणीची थालिपिठं, भरली वांगी, लसणीसकट दरवळणारं कुळथाचं खमंग पिठलं या गोष्टी बाहेर कशा मिळणार? आई नावाचा प्राणी अनुपस्थित. परिणामी प्रेम-वात्सल्य-माया इत्यादी तुलनेनं दुर्लक्षित गोष्टींच्या अभावापेक्षाही खरा जाणवला तो हा थेट पोटाशी येऊन भिडणारा प्रश्न.
एकोजीराजांच्या बंगळुरी मराठी खाद्यसंस्कृतीची अगदीच दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे उकिरडे हुंगण्याचा प्रश्नही निकाली निघालेला. इथल्या सगळ्याच काऱ्या म्हराटी लोकांची हीच अवस्था. क्ष त्याला अपवाद नव्हताच. बरं, तो नि अ मला इथे सिनियर. त्यांची माझ्यापेक्षा काही महिने जास्त उपासमार झालेली. त्यामुळे माझं इथं आगमन होताच दोघांच्याही नजरेत ’बरी स्वैपाकीण गावली’ अशा चांदण्या लुकलुकत असलेल्या. (यथावकाश मी त्यांचा यशस्वीरित्या भ्रमनिरास केला ती गोष्ट वेगळी!)
आल्या आल्या पहिल्याच आठवड्यात क्ष चा स्वैपाकी रजेवर असल्याचं निमित्त करून आम्ही वीकान्ताआधीच जंगी बेत आखला.
वांग्याचं भरीत, तांदळाच्या भाकऱ्या नि खरडा.
माहौल साधारण हा असा -
भरताचं वांगं, तांदळाचं पीठ, कांदा-मिरची इत्यादी प्रकरण जमवून साधारण साडेदहाच्या सुमाराला अ नि क्ष माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले.
दोघांनीही भरताच्या आशेनं बहुधा संध्याकाळच्या न्याहारीला सुट्टी दिलेली.
खाजवायला गिटार, वाजवायला ल्यापटॉपात बरीचशी गाणी. बऱ्याच गप्पा आणि’सरदारजीची अक्कल’च्या धर्तीवर ’अण्णा लॉजिक’चे खूप सारे किस्से.
मारे वांगं भाजून, कांदे-बिंदे चिरून ठेवलेले.
तेव्हा मिक्सर प्रकरण नव्हतं, म्हणून वैद्यांकडे औषधं कुटायला असतो तसला एक संगमरवरी खलबत्ताही पैदा करून ठेवलेला.
मी घरी येऊन उकड काढण्यापासून सुरुवात केली, तेव्हा साधारण अकरा वाजले होते. एकीकडे दाणे-मिरच्या भाजल्या. खरडा कुटला. आसमंतात दरवळ होता असणार.
गरम भाकऱ्या घेऊन जेवायला बसणार, इतक्यात आम्हांला खिडकीपाशी कुणीतरी डोकावल्याचा भास झाला. भासच असणार, असा सोईस्कर समज करून घेऊन जनतेनं जेवणाखेरीज कुठेही लक्ष पुरवण्याचं नाकारलं.
परत कुणीतरी डोकावलं. रात्री बाराला हा काय प्रकार, असं म्हणतो आहोत, तोच बेलही वाजली. एक आख्खा पुरुष आहे की सोबत, असं म्हणून क्ष ला प्रचंड कॉम्प्लेक्स देत मी खिदळत दार उघडलं. तर दारात घरमालक.
वय साधारण साठीच्या आसपास. लुंगी या वस्त्रविशेषावर मोठी श्रद्धा. तांबारलेले डोळे. वर्ण - रंग गेल्यास पैसे परत.
घरात सोन्याच्या बिस्किटांची चोरून मोजदाद चाललेली असल्यासारखे संशयी भाव नजरेत.
काही कळेचना.
मग गृहस्थ क्ष कडे आपादमस्तक (अक्षरश: आपादमस्तक बरं का!) पाहून म्हणतो - ये कौन है? लडका लोग आना अलाउड नही.
पुढचा साधारण दीड तास संस्कृती, पुरोगामीपणा आणि सनातनीपणा, मसाज पार्लर चालवणाऱ्या हल्लीच्या मुली, घराची मालकी, भाड्याचे तपशील, भाडेकरूंचे हक्क, कुवॉंर मुलींच्या चारित्र्यरक्षणाची जबाबदारी... अशा गोड सुखसंवादात गेला.
क्ष बिचारा मुकाट चालता झालेला. मी नि अ ’भाडं भरूनच्या भरून पाहुणा जेवायला बोलवायची सोय नाही म्हणजे काय’ या एकाच वाक्यावर तऱ्हेतऱ्हेची फुणफुण करण्यात मग्न.
महिना भरायच्या आत आम्ही घर बदललं हे सांगणे न लगे! (पुढच्याच आठवड्यात माझ्या वाढदिवशी मुंबैकर मित्रांनी सरप्राइझ म्हणून पाठवलेला बुके रात्री बाराच्या ठोक्याला घेताना मालक, मालकांचा आडमाप वाढलेला मुलगा आणि त्यांच्या नजरेतली ’म्हटलं नव्हतं, पोरी चवचाल असणार म्हणून...’ अशी एक तुच्छ जेन्युईन छटा पाहताना करमणूक झालीच!)
पण त्या दिवशीचं ते वांग्याचं भरीत फुकट गेलंच. :(
परवा क्ष आणि क्ष च्या आणखी एका मित्रालाही आमंत्रित करून, भरीत-भाकरी-खरडा करून आम्ही समारंभानं साग्रसंगीत जेवलो. आता आमचे नवे घरमालक अत्यंत आधुनिक विचारांचे असून घरी कोणत्याही आणि कितीही मुलाला / मुलांना कधीही घेऊन येण्याची परवानगी आहे!
ही वांग्याच्या भरताची पाककृती -
एक बरंसं काळं-जांभळं गरगरीत वांगं चांगलं खरपूस भाजून घ्यावं. सोलून ठेचून घ्यावं. (देठ काढून टाकावं लागतं खरं, पण देठाजवळचा गर चोखून खायला असा खमंग लागतो, की ज्याचं नाव ते.) फोडणी करून त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत आणि बाजूला काढून ठेवावेत. मग त्या तेलात फोडणी करून भरपूर हिरव्या मिरच्या (भाजलेल्या असल्यास उत्तम) आणि कांदा (हाही पातीचा मिळाला तर बरं) परतून घ्याव्यात. त्यावर ठेचलेलं वांगं घालावं आणि मग एक वाफ काढावी. मीठ, बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर आणि ते तळून ठेवलेले शेंगदाणे वर घालावेत. भरीत तयार. खरं तर ठेचलेली लसूण कांद्याबरोबर चांगली लागते. पण महाराष्ट्राच्या कोस्टल एलिमेन्टचं प्राबल्य असल्यामुळे मला हात आवरता घ्यावा लागला.
तेलावर भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि तेलावर खरपूस भाजलेले शेंगदाणे, बरीचशी कोथिंबीर आणि लसूण असं सगळं मिठासोबत भरड वाटलं की अफलातून खरडा तयार होतो. तो असला की मग भरतात लसूण नसली तरी माझी फार चरफड होत नाही!
एन्जॉय!

Comments
he he he
ekdam khamang zhalay poshta!!
lai zakas!!
to sane man pan kay kay solid banwat asto tyala takayla sang pucha item!! ;)
अर्थात, मी कृष्णाकाठचीच. कृष्णेचं पाणी जितकं बेचव, तितकीच वांगी चवदार.
अशी वांगी त्रिभुवनात नाहीत!
हे भरीतापेक्शाही भन्नाट जमलंय