Posts

Showing posts from July 20, 2008

वांग्याचे भरीत

आईची आठवण या चित्रपटीय गळेकाढू प्रकरणातला माझ्याबाबतीत सर्वांत खरा आणि महत्त्वाचा भाग असेल, तर तो इतकाच की घरी मिळणारं आयतं, चवीपरीचं आणि पारंपरिक अन्न घराबाहेर राहिल्यावर मिळेनासं झालं. बाहेरचं खाणं ही माझ्यातल्या मुंबैकरणीला अगदी सवयीची नि आवडीची गोष्ट खरीच. पण किती झालं तरी ताकातली उकड, भाजणीची थालिपिठं, भरली वांगी, लसणीसकट दरवळणारं कुळथाचं खमंग पिठलं या गोष्टी बाहेर कशा मिळणार? आई नावाचा प्राणी अनुपस्थित. परिणामी प्रेम-वात्सल्य-माया इत्यादी तुलनेनं दुर्लक्षित गोष्टींच्या अभावापेक्षाही खरा जाणवला तो हा थेट पोटाशी येऊन भिडणारा प्रश्न. एकोजीराजांच्या बंगळुरी मराठी खाद्यसंस्कृतीची अगदीच दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे उकिरडे हुंगण्याचा प्रश्नही निकाली निघालेला. इथल्या सगळ्याच काऱ्या म्हराटी लोकांची हीच अवस्था. क्ष त्याला अपवाद नव्हताच. बरं, तो नि अ मला इथे सिनियर. त्यांची माझ्यापेक्षा काही महिने जास्त उपासमार झालेली. त्यामुळे माझं इथं आगमन होताच दोघांच्याही नजरेत ’बरी स्वैपाकीण गावली’ अशा चांदण्या लुकलुकत असलेल्या. (यथावकाश मी त्यांचा यशस्वीरित्या भ्रमनिरास केला ती गोष्ट वेगळी!) आल्या आल्