भाजणीच्या पोळ्या
पोळपाट-लाटणं हे स्वैपाघरातलं एक अत्यावश्यक आयुध मानलं जातं. पण सुदैवानं अ आणि मी दोघींनाही पोळ्या नावाच्या प्रकारात यत्किंचितही इंट्रेष्ट नव्हता - नाही. पोळी तव्यावर उलटली की त्यातल्या वाफेचा जो एक विशिष्ट वास येतो, त्यानं मला भरल्या पोटी मळमळूही शकतं - इतकी माझी नावड टोकाची आहे. अ लाही असंच वाटतं, हे कळल्यावर आपण योग्य रूममेटच्या घरात पडल्याचं माझ्या लक्षात आलं आणि सुमारे अडीच महिने कणीक नावाचा पदार्थ आम्ही दुरूनही पाहिलाही नाही. भाताचे विविध प्रायोगिक प्रकार, पोहे-उपमा-थालिपीठ ही त्रयी, कधीमधी उकड-मोकळ भाजणी-धिरडी (होय, होय, धि-र-डी. प्लीज डोण्ट अंडरएस्टिमेट मी, ओके?) आणि भाकर्या (विश्वास ठेवणं अवघड जात असलं तरीही, मला उत्तम भाकर्या करता येतात. हवं तर अ ला विचारून खात्री करून घ्या. मला कुचकामी ठरवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊन खोटं बोलू शकते. पण माझ्या हातची भाकरी खाऊन तिनं तीन महिन्यांच्या इडलीचा वनवास संपल्याची जी मुद्रा केली होती, ती ती स्वत:ही विसरलेली नाही. - शिवाय अजून तरी स्वैपाघर माझ्या हातात आहे, हे ती समजून आहे.) यांवर आमचं उत्तम चाललं होतं. पण परमेश्वराला का कुठे असं पाह...