Posts

भाजणीच्या पोळ्या

पोळपाट-लाटणं हे स्वैपाघरातलं एक अत्यावश्यक आयुध मानलं जातं. पण सुदैवानं अ आणि मी दोघींनाही पोळ्या नावाच्या प्रकारात यत्किंचितही इंट्रेष्ट नव्हता - नाही. पोळी तव्यावर उलटली की त्यातल्या वाफेचा जो एक विशिष्ट वास येतो, त्यानं मला भरल्या पोटी मळमळूही शकतं - इतकी माझी नावड टोकाची आहे. अ लाही असंच वाटतं, हे कळल्यावर आपण योग्य रूममेटच्या घरात पडल्याचं माझ्या लक्षात आलं आणि सुमारे अडीच महिने कणीक नावाचा पदार्थ आम्ही दुरूनही पाहिलाही नाही. भाताचे विविध प्रायोगिक प्रकार, पोहे-उपमा-थालिपीठ ही त्रयी, कधीमधी उकड-मोकळ भाजणी-धिरडी (होय, होय, धि-र-डी. प्लीज डोण्ट अंडरएस्टिमेट मी, ओके?) आणि भाकर्या (विश्वास ठेवणं अवघड जात असलं तरीही, मला उत्तम भाकर्या करता येतात. हवं तर अ ला विचारून खात्री करून घ्या. मला कुचकामी ठरवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊन खोटं बोलू शकते. पण माझ्या हातची भाकरी खाऊन तिनं तीन महिन्यांच्या इडलीचा वनवास संपल्याची जी मुद्रा केली होती, ती ती स्वत:ही विसरलेली नाही. - शिवाय अजून तरी स्वैपाघर माझ्या हातात आहे, हे ती समजून आहे.) यांवर आमचं उत्तम चाललं होतं. पण परमेश्वराला का कुठे असं पाह...

...ऊर्फ सुगरणीचा सल्ला!

काही कबुल्या: १) खाण्यापिण्यावर लिहिणं ही काही माझी वरिजनल आयडिया नव्हे. अशीच भटकंती करताना काही झकास फूड ब्लॉग्स मिळाले. अशीही मला 'रुचिरा' टाईपची पुस्तकं वाचायचा छंद आहेच. त्याच चालीवर हे ब्लॉग्स मनापासून वाचले. 'कुठलीही खाद्यसंस्कृती सर्वश्रेष्ठ नसते. एका खाद्यसंस्कृतीवर प्रेम करताना दुसरीला कदापि कमी लेखायचं नाही. नीट माहीत करून घ्यायचं, करून पाहायचं, खाऊन पाहायचं आणि जबाबदारीनं - त्या संस्कृतीच्या परंपरेची जाणीव ठेवून - मगच जीभ टाळ्याला लावायची. खरीखुरी चव हॉटेलात कधीच पुरती गावत नाही, तिच्या पुरतं पोटात शिरायचं असेल - तर कुण्या गृहिणीचा गुरुमंत्र घ्यावा लागतो. हे 'झट मंगनी पट ब्याह' कामही नव्हे. ही साधना आहे...' हे तिथले अलिखित संकेत होते - आहेत. ते मला जबराट आवडले. सुदैवानं-दुर्दैवानं स्वैपाकाच्या प्रांतात हात-पाय हलवण्याचं काम सध्या माझ्या गळ्यात पडलं आहे. तिथले काही अफलातून - काही भीषण अनुभव पोटात खदखदत होतेच. म्हणून मग (मुख्यत्वे नुपूर च्या ब्लॉगमुळे) हिय्या केला. अर्थात ती (आणि इतर बरेच जण. वेळोवेळी त्यांचा सादर उल्लेख करीनच!) या प्रांतात...