उकडीच्या करंज्या
उकडीच्या करंज्या नामक पदार्थाची भारतीय, विशेषतः कोकणस्थ मराठी, पाकविश्वात भर टाकल्याचा मला भयंकर आनंद झाला आहे. त्यात भरीस भर म्हणून चाकाच्या पुनर्शोधाचं पातक कपाळी नाही. पर्यायाने नाविन्य ह्या निकषावर पैकीच्या पैकी गुण. दीडेक वर्षांपूर्वी एका मंगलसमयी आपल्या पाककलाविषयक प्रयोगांची व्याप्ती उकडीच्या मोदकांपर्यंत विस्तारावी असा विचार मनात आला. नाही म्हणायला फ्रोज़न पराठ्यांचा वीट येऊन केलेल्या पोळ्या; ज्यावर अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी जगतात त्या छोले, राजमा इ. हुकमी उसळी; दिवाळी, थँक्सगिविंग अशा सणासुदीला पुर्या, पुलाव (एरवी मिक्स वेजीटेबलचं पाकीट ओतून शिजवलेल्या तांदळापेक्षा वेगळा भात); थालिपीठांपासून उकडीच्या भाकर्यांपर्यंतचे अनेक कोकणस्थी प्रकार; चिकन, कोलंबी असा सामिष आहार; शिरा, खीर, शेवयांचा शिरा, खांडवी, ओल्या नारळाच्या करंज्या अशी मिष्टान्ने वगैरे वगैरे, अशा काही यशस्वी प्रयोगांचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे हा प्रयोग करण्याचं धाडस अधिक (फाजील) आत्मविश्वास. पण एकंदरीत हा पदार्थ पाककलाविशारद होण्याच्या शेवटच्या प्रात्याक्षिक परीक्षेत येत असल्यामुळे उगीच जाहिरात केली नाही. न ज