Posts

Showing posts from 2014

व्यायामशाळा आणि कॅलर्‍या

वैधानिक इशारा : वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारा माणूस दिसला रे दिसला , की काही लोक विनोदाच्या अपेक्षेनं आधीच खुळचटासारखे खिदळायला लागतात. हा लेख वाचणार्‍यांत असे नग असतील , तर त्यांनी माझा नमस्कार स्वीकारून ओसरीवरूनच तातडीनं निघण्याचं करावं. किलो आणि कॅलर्‍या ' मध्ये तुम्हांला विनोद सापडणार नाही , करुणरसपरिपोष आणि कटोविकटीचा संताप तेवढा सापडेल. ट्रॅफिक जॅममधून रखडत-पेंगत मी अंधार-उजेडाच्या सीमेवर कशीबशी ऑ फि सातून घरी पोचले आहे. जिमला जाण्याचा जामानिमा घाईघाईत करून उपाशीपोटी जिम गाठलंय. वॉर्मअप , उड्या-धावपळ , आणि मग स्ट्रेचेस् असा पुरेसा त्रास देहाला दिला आहे. धन्य धन्य वाटतंय. त्याच आनंदाच्या लाटेवर तरंगत मी अन्नविषयक सल्लागाराला भेटले आहे. हा आमचा संवाद. सल्लागारः काय काय खाता तुम्ही रोज ? ( मी आधी प्रचंड खजील होते. आपण दिवसभरातून किती वेळा चहा-कॉफ्या ढोसतो आणि काय-काय चरबीयुक्त गोष्टी ओरपतो याचा हिशोब या माणसाला प्रामाणिकपणे द्यायचा या कल्पनेनं सटपटायला होतं. पण आता आलोच आहे तर होऊन जाऊ द्या , म्हणून सगळा पाढा वाचते. काय वाटेल ते वाटेल साल्याला. गेला उडत.) सल्