Posts

Showing posts from July 6, 2008

...ऊर्फ सुगरणीचा सल्ला!

काही कबुल्या:

१) खाण्यापिण्यावर लिहिणं ही काही माझी वरिजनल आयडिया नव्हे. अशीच भटकंती करताना काही झकास फूड ब्लॉग्स मिळाले. अशीही मला 'रुचिरा' टाईपची पुस्तकं वाचायचा छंद आहेच. त्याच चालीवर हे ब्लॉग्स मनापासून वाचले.
'कुठलीही खाद्यसंस्कृती सर्वश्रेष्ठ नसते.
एका खाद्यसंस्कृतीवर प्रेम करताना दुसरीला कदापि कमी लेखायचं नाही.
नीट माहीत करून घ्यायचं, करून पाहायचं, खाऊन पाहायचं आणि जबाबदारीनं - त्या संस्कृतीच्या परंपरेची जाणीव ठेवून - मगच जीभ टाळ्याला लावायची.
खरीखुरी चव हॉटेलात कधीच पुरती गावत नाही, तिच्या पुरतं पोटात शिरायचं असेल - तर कुण्या गृहिणीचा गुरुमंत्र घ्यावा लागतो.
हे 'झट मंगनी पट ब्याह' कामही नव्हे. ही साधना आहे...'
हे तिथले अलिखित संकेत होते - आहेत. ते मला जबराट आवडले.
सुदैवानं-दुर्दैवानं स्वैपाकाच्या प्रांतात हात-पाय हलवण्याचं काम सध्या माझ्या गळ्यात पडलं आहे. तिथले काही अफलातून - काही भीषण अनुभव पोटात खदखदत होतेच. म्हणून मग (मुख्यत्वे नुपूरच्या ब्लॉगमुळे) हिय्या केला. अर्थात ती (आणि इतर बरेच जण. वेळोवेळी त्यांचा सादर उल्लेख करीनच!) या प्रांतात 'दादा&…